Showing posts with label मराठी बातम्या. Show all posts
Showing posts with label मराठी बातम्या. Show all posts

वसईत चोर समजून सेल्सगर्लला लाथाबुक्क्यांनी मारहाण
वसई : हिंदुस्थान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीत कार्यरत असलेल्या सुषमा पांडे यांना काही जणांनी चोर समजून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.बुधवारी दुपारी दीड वाजता वसईतील पापडी भागामध्ये हि घटना घडली.

सोशल मीडियावर ह्या घटनेचा व्हिडिओ वायरल झाला आहे.मारहाणीच्या निषेधार्थ या कंपनीत काम करणाऱ्या शेकडो महिलांनी वसई पोलीस ठाण्यात घेराव घातला व आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे..

 विशेष म्हणजे मारहाणी झाली त्यावेळी पोलीस कर्मचारी उपस्थित असल्याची म्हंटल जात आहे.त्यामुळे पोलीस काय कारवाई करतील,या कडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
Source-Internet

पांगरीत शिवप्रेमी मित्र मंडळाचे गणपतीचं विसर्जन थाटा माटात पार पडले.

पांगरी(सोलापूर),दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर लाडक्या बाप्पांना काल सोमवार (ता,२४) निरोप दिला,शिवप्रेमी मंडळाचे गणपती म्हणजे बातच न्यारी गणेशोत्सव आणि शिवप्रेमी मित्र मंडळ म्हणजे अनौखा माहोल. गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य रथ तयार करण्यात आला होता. अतिशय मनमोहक कलाकृतीने हा रथ सजला होता.त्याच बरोबर बाल संप्रदाय मंडळाने पाउल साजरे केले.हे विसर्जन साय.६:३० ला पांगरी बस स्थानकातून  निघाले पुढे अचानक चौक,काळे गल्ली,गोडसे गल्ली,रामपेठ,शिवाजी चौक करत ठीक १०:०० वाजता पार पडली.विसर्जन व्यवस्तीत पार पाडण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष शिवाजी देशमुख,अविनाश शेरखाने,वाहिद शेख,पांडुरंग निमकर,अतुल देशमुख,संदीप देशमुख,अमित कोल्हे,इर्शाद शेख,स्वप्नील शेरखाने,संभाजी देशमुख,शरद जाधव,अमोल गायकवाड,सिकंदर खान,महेश जाधव,भैया जवळगे,निलेश जाधव तसेच मंडळाचे सर्व सदस्यांनी व हिंदू -मुस्लीम बांधवानी परिश्रम घेतले.